मतदार यादी घोळ : बिग बी नाराज, षडयंत्राचा आरोप

Last Updated: Friday, April 25, 2014, 13:35

मतदार यादीमधल्या घोळामुळे मुंबईतल्या हजारो नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलंय. त्यामुळेच आता यासंदर्भात शिवसेना, मनसे आणि भाजप निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहेत. मतदार यादीमध्ये नावांचा घोळाच्या पाठिमागे काँग्रेस राष्ट्रवादीचंचं षडयंत्र असल्याचा आरोपही हे पक्ष करतायत.

मुंबईत मतदार यादीत घोळ, सेलिब्रिटी मतदानापासून वंचित

Last Updated: Thursday, April 24, 2014, 11:42

मुंबईत मतदार यादीत घोळ झाल्याचे दिसून आलेय. सेलिब्रिटी मतदानापासून वंचित राहिले आहेत.

पुण्यात दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांना घेराव, नाशिकमध्येही घोळ

Last Updated: Friday, April 18, 2014, 17:52

पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी 58 टक्के मतदान झालं असलं तरी मतदार यादीत घोळ झाल्यानं अनेक पुणेकरांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. पुण्यातल्या मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याचा मतदारांचा आरोप आहे. जे नागरिक मतदान करू शकले नाहीत त्यांना मतदान करण्याचा अधिकार द्या, अशी मागणी भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी केलीय. दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी घेराव घातला. तर नाशिकमध्येही घोळ झाल्याचे दिसत आहे.

तुम्हीच करा, मतदार यादी अद्यावत!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 11:08

तुमचे मतदार यादीत नाव नाही. किंवा नाव नोंदवूनही तुमचे मतदान कार्ड मिळाले नसेल तर घाबरून जाऊ नका. तुम्हीच तुमची माहिती आता मतदार यादीत समाविष्ट किंवा अद्यावत करू शकता. तेही घरबसल्या.