Last Updated: Sunday, November 18, 2012, 08:10
बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शनिवारी दुपारी ३.३३ वाजता अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. महाराष्ट्राच्याच नव्हे तर अवघ्या देशाच्या राजकारणात गेली पाच दशके घोंगावणारे वादळ शांत झाले. आज रविवारी बाळासाहेबांना शिवतीर्थावरच सायंकाळी ५ वाजता अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.