मुंबई, नवी मुंबईत अपघात सत्र

Last Updated: Thursday, May 31, 2012, 08:22

मुंबईमध्ये बुधवारी रात्री वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झाले. डोंगरी भागात कंपनीचा बॉयलर घेऊन जाणारा ट्रेलर उलटला. मुंबई पोर्ट ट्रस्टवरुन निघालेला हा ट्रेलर गुजरातला जात होता. ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानं हा ट्रेलर उलटला. ट्रेलरचा ड्रायव्हर फरार असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.