Last Updated: Monday, October 8, 2012, 15:22
तब्बल १५ वर्षांनी कम बॅक करणाऱ्या श्रीदेवीने पुन्हा एकदा तिच्या अभिनयाने बॉक्सऑफिसवर कमाल केलीय. कम बॅक करणाऱ्या इतर हिरोइन्सप्रमाणे गाजावाजा न करता श्रीदेवीने शशी या पात्राला पूर्ण न्याय दिलाय. श्रीदेवीचा ‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट पाहताना असं एकदाही वाटत नाही की तिने एवढ्या मोठ्या गॅपनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.