राष्ट्रवादीचा `कचरा`, उपमहापौरांना चप्पलेचा प्रसाद

Last Updated: Wednesday, October 10, 2012, 17:09

नवी मुंबई महापालिकेत मंगळवारी अभूतपूर्व गोंधळ झाला. कच-याच्या ठेक्यावरून विरोधकांनी गोंधळ घालत थेट महापौरांना धक्काबुक्की केली. मात्र काँग्रेस आणि शिवेसनेच्या महिला नगरसेविकांनी मात्र उपमहापौर भरत नखाते यांच्या पाठित चपलेनं धपाटे घातले. त्यामुळं सभागृहाच्या इभ्रतीचाच कचरा झाल्याचं चित्र महापालिकेत दिसलं.