उमरग्यात भीषण अपघातात न्यायाधिशांसह दोघांचा मृत्यू

Last Updated: Tuesday, April 1, 2014, 10:21

लातूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात, दोघांचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले आहेत. उमरग्याजवळ हा भीषण अपघात झाला. हे लोक लातूरहून गुलबर्गा इथं जात असतांना गाडीचे टायर फुटून हा अपघात झाला. विश्वास गोंधपूरे आणि गाडीचा चालक यांचा जागीच मृत्यू झाला आहे.