मोदींच्या विजयासाठी पत्नी जशोदाबेन यांचं मतदान

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 14:18

ज्यांची अनेक दिवसांपासून सर्व माध्यमं आणि नागरीक वाट पाहत होते, त्या जशोदाबेन मोदी आज समोर आल्या. आज गुजरातमध्ये सर्व २६ जागांसाठी मतदान होतंय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला. मेहसाणा मतदारसंघात त्यांनी मतदान केलं.

धक्कादायक: मोदी गेल्यानंतर सपानं पुतळा धुतला!

Last Updated: Thursday, April 24, 2014, 17:27

मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बीएचयूमध्ये मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. त्यानंतर काही वेळातच समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी निषेध करत पुतळा गंगाजलनं धुतला.

अमेठीतून राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल

Last Updated: Saturday, April 12, 2014, 15:53

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांच्यासोबत सोनिया गांधी, प्रियांका गांधीही आणि रॉबर्ट वडेरा हेदेखील उपस्थित होते.

पत्नीचं नाव जशोदाबेन, मोदींची पहिल्यांदाच जाहीर कबुली

Last Updated: Thursday, April 10, 2014, 11:37

आत्ताआत्तापर्यंत आपल्या वैवाहिक स्थितीवर चुप्पी साधणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आपण विवाहीत असून आपल्या पत्नीचं नाव `जशोदाबेन` असल्याची जाहीर कबुली शपथेवर दिलीय. त्यामुळे, मोदींचं हे `ओपन सिक्रेट` आता जगजाहीर झालंय.

गुजरातच्या वडोदऱ्यातून मोदींचा अर्ज दाखल

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 17:38

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज वडोदरा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

मोदींच्या उमेदवारी अर्जावर `चहावाल्याची` सही

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 13:22

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज वडोदरा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

योगेश घोलप बंडखोरी करणार? उमेदवारी अर्ज दाखल

Last Updated: Wednesday, March 26, 2014, 18:00

शिर्डीमध्ये बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिक्षा झालेले बबनराव घोलप यांचे पूत्र योगेश घोलप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ते बंडखोरी करण्याची शक्यताय. तर शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय.

शशि थरुर यांची संपत्ती... फक्त २३ करोड!

Last Updated: Wednesday, March 19, 2014, 10:09

केंद्रीय मंत्री शशि थरुर यांनी आपली संपत्ती जवळजवळ २३ करोड रुपये असल्याचं घोषित केलंय.