एसटीची ७ मार्चपासून २.५४ टक्के भाडेवाढ

Last Updated: Wednesday, March 5, 2014, 10:32

राज्यात एसटीचे ७ मार्चपासून भाडे वाढणार आहे. याबाबतची घोषणा एसटी महामंडळाने केली आहे. सर्वसामान्यांच्या एस.टी.ने ७ मार्चपासून २.५४ टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. ३१ किलोमीटरनंतर ५४ किलोमीटरपर्यंत १ रुपया तर ५५ ते ९० कि.मी.पर्यंत २ रुपये आणि ९१ ते १५० कि.मी.करिता ३ रुपये अशी भाडेवाढ असेल.

एसटीचा प्रवास महागला, ९ नोव्हेंबरपासून भाडेवाढ

Last Updated: Thursday, November 7, 2013, 20:06

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ ९ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. पहिल्या १२ किमीपर्यंत ही भाडेवाढ नाही. ही भाडेवाढ १ आणि २ रूपये टप्प्यानुसार असणार आहे.

खिशावर एसटीचा डल्ला

Last Updated: Sunday, August 5, 2012, 15:02

एसटीला दररोज लाखो रूपयांचा तोटा होत असल्याचे कारण पुढे करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशावर एसटी पुन्हा डल्ला मारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही भाडेवाढ ४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. ही भाडेवाढ ६.२५ टक्के इतकी असणार आहे.