रेल्वेचा प्रवाशांच्या खिशावर दरोडा! IRCTCची फसवणूक

Last Updated: Tuesday, February 5, 2013, 14:36

सर्वसामान्य माणसांचे पैसे लुटण्यात ‘रेल्वे’ही सुसाट निघाली आहे. टिकिट खिडकीवर सुट्टे पैसे नसल्याचं कारण देत प्रत्येक तिकिटामागे चार रुपये जास्त घेणं आता कायदेशीर करून टाकलं आहे. याहून मोठी गोष्ट म्हणजे रेल्वेची वेबसाइट असणाऱ्या IRCTC वर ऑनलाइन रिझर्वेशन करतानाही बँक अकाउंटमधून राऊंड फिगरने पैसे कापले जात आहे.