कारले काय करते, वजन घटवतेच...शिवाय बरेच काही!

Last Updated: Thursday, August 29, 2013, 15:50

कारले म्हटले अनेक जण तोंड मुरडतात. पण कारलं हे आरोग्यवर्धक आहे हे जर तुम्हाला कोणी सांगितलं तर....ते नक्कीच खा. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास कारले मदत करते. हेच कारलं अनेकांना अनेक गंभीर आजारांपासून दूर ठेवू शकते. वजन घटवण्यापासून मधुमेह, मुतखडासारख्या समस्यांना दूर ठेवण्यापर्यंत कारल्याचा उपयोग होतो.