शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा, याची देही याची डोळा

Last Updated: Friday, June 6, 2014, 20:58

शिवछत्रपतींचा 341 वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात रायगडावर साजरा करण्यात आला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे या दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तारखेप्रमाणे साज-या होणारा हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो शिवप्रेमींनी गर्दी केली होती.