शोएबसमोर थरथरायचे सचिनचे पाय - आफ्रिदी

Last Updated: Sunday, October 9, 2011, 14:27

शोएबचा चेंडू खेळताना सचिनचे पाय लटपटत असल्याचं मी पाहिलंय, असा दावा करत आफ्रिदीनं आपल्या मित्रासाठी ‘ बॅटिंग ’ केलेय. पण, सचिनबद्दल काहीतरी बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया क्रिकेटवर्तुळात व्यक्त होतेय.