कोलगेट प्रकरणी खासदार विजय दर्डा यांच्यावर समन्स

Last Updated: Thursday, May 8, 2014, 17:47

कोलगेट घोटाळ्याप्रकरणी राज्यसभा सदस्य खासदार विजय दर्डा आणि इतर तिघांविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेऊन सीबीआयच्या विशेष न्यायालयानं त्यांना येत्या २३ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यासंबंधी समन्स जारी केलंय. न्या. मधू जैन यांनी यासंबंधीचा आदेश दिला.

कोळसा घोटाळाः सरकारचे पाय खोल रुतले

Last Updated: Friday, April 26, 2013, 16:54

कोळसा घोटाळ्यात सरकारचे पाय आणखीनंच रूतले आहेत. चौकशी अहवालात फेरफारासंदर्भात सीबीआय संचालकांनी सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या अहवालात सरकारचं पितळ उघडं पडलंय.

`कोलगेट घोटाळा : दर्डा कुटुंबीयांचा सहभाग`

Last Updated: Saturday, September 1, 2012, 17:48

कोळसा घोटाळा प्रकरणात खासदार विजय दर्डा आणि शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचे हात काळे झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. त्याचप्रमाणे सुबोधकांत सहाय यांचाही कोळसा खाण घोटाळ्यात हात असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.