क्रिकेटच्या देवाचं बिहारमध्ये होणार मंदिर!

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 08:28

सचिन तेंडुलकर आता नावाचाच देव राहिला नाही तर खरोखरच त्याचं आता मंदिर होतंय. बिहारमध्ये सचिनच्या सन्मानार्थ चक्क मंदिर उभारण्यात येणार आहे. एवढंच नाही तर मंदिराचा पायाही आज रचला जाणार असून मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही आजच होणार आहे.