एका खड्ड्याचं आत्मवृत्त

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 16:10

नमस्कार..... सध्या तुमच्या जवळच मी मुक्कामाला आलोय. किमान चार महिने तरी माझा मुक्काम हलण्याची चिन्हं नाहीत. पाऊस आला रे आला की मी तुमच्या भेटीला न चुकता येतो. ब-याच वेळा आपल्या भेटीची सुरुवातच शिव्याशापांनी होते...... तुम्हा सगळ्यांना माझ्या नावानं बोटं मोडायची सवयच झालीय.....