Last Updated: Wednesday, April 11, 2012, 09:20
सुटीच्या काळात खासगी बसचालक बसभाडे दुप्पट ते तिप्पट आकारता. तसेच दर सप्ताहाखेरीस तिकिटांचे दर भरमसाट वाढवून प्रवाशांना लुटणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांना येत्या चार आठवडय़ांत तिकीटाचे दर ठरवून द्यावेत, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. यामुळे मे महिन्यात बाहेरगावी जाणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.