`खिलाडी 786`मुळे दुखावल्या पाक सेंसॉर बोर्डच्या भावना!

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 17:11

अक्षय कुमारच्या ‘खिलाडी 786’ सिनेमाच्या जाहिरातींवर पाकिस्तान सेंसॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. 786 हा मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र अंक असून, या सिनेमामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जातील, अशी त्यांना शक्यता वाटत आहे.