लोहा नगरपालिकेनंतर ३ ग्रामपंचायतींवरही मनसेचं वर्चस्व

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 11:37

शहापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा २७ ऑक्टोबरला निकाल लागला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं इथंही मुसंडी मारलीय. मनसे पॅनलचे सदस्य तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये विजयी झाले आहेत. गोठेघर, वाफे आणि खुटघर ग्रामपंचायतींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वर्चस्व प्रस्तापित केलंय.