जीवघेणी ‘गोफणगुंडा’ची मध्ययुगीन प्रथा अखेर बंद!

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 15:39

कोपरगाव तालुक्यात कोकमठाण आणि संवत्सर या गावातील गोफणगुंड्याच्या लढाईची प्रथा अखेर बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय. मध्ययुगातली ही प्रथा बंद व्हावी, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यासाठी मोठा पाठपुरावा केला होता.