Last Updated: Tuesday, October 9, 2012, 11:16
आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात अनेक जण ‘ब्रेकफास्ट’ला (नाश्ता) सुट्टी देतात. मात्र, ही सुट्टी तुमचे आरोग्य बिघडवू शकते, याची कल्पना अनेकांना नसते. एकवेळ दुपारी जेवण घेवू नका, मात्र नाश्ता केलाच पाहिजे. त्यामुळे तुमचा उत्साह कायम राहतो आणि काम करण्याची शक्ती मिळते.