चैत्यभूमीवर लाखो आंबेडकर अनुयायी, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

Last Updated: Friday, December 6, 2013, 16:07

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेत. देशासह महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून लाखो आंबेडकर अनुयायींची पावलं चैत्यभूमीकडे वळलीत. तर चैत्यभूमीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ५७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री सचिन अहिर यांनी चैत्यभूमी आणि इंदू मिलवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.

दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळणार

Last Updated: Thursday, December 5, 2013, 21:44

६ डिसेंबरला साजरा होणा-या ५७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी आणि परिसरात जोरदार तयारी करण्यात आलीय. या ठिकाणी महानगरपालिकेच्यावतीन चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्याशी तैनात करण्यात आल्यात.