Last Updated: Monday, September 17, 2012, 21:14
ज्योतीकुमारी चौधरीच्या बलात्कार आणि खून प्रकरणातल्या दोन आरोपींची फाशीची शिक्षा हायकोर्टानं कायम ठेवली आहे. या प्रकरणात कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाडे यांना हायकोर्टानं दोषी ठरवलंय. बलात्कार आणि खून याप्रकरणी दोन्ही आरोपींना पुणे सत्र न्यायालयानं याआधीच दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात आरोपींनी हायकोर्टात दाद मागितली होती.