भारतीयांच्या नजरा, लंकेचा २३२मध्ये खुर्दा!

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 18:09

सर्व भारतीयांच्या नजरा लागून राहिलेल्या आशिया कप क्रिकेटच्या आजच्या शेवटच्या लिग सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेला २३२ धावांत गुंडाळलं आहे. आघाडीचे फलंदाज झटपट परतल्यानंतर चमारा कपुगेडरा आणि उपुल थरंगा यांच्या सावध पवित्र्यानंतर लंकेला २३२ चा पल्ला गाठता आला.

लंकेची खराब सुरवात, टीम इंडियाच्या धडकी मनात

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 16:01

श्रीलंकेची सुरवात मात्र खराब झाली आहे. श्रीलंकेचे महत्त्वाचे तीनही बॅट्समन आऊट झाले आहेत. संगकारा, दिलशान आणि जयवर्धने हे झटपट आऊट झाले असल्याने श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या आहेत.