ठाणेकरांचा उमेदवारांना धक्का, स्वीकारणार `नोटा`चा पर्याय

Last Updated: Monday, April 7, 2014, 08:32

ठाणे मुंबई सीमेवरील कोपरी मुलुंड परिसरातले जवळपास २०,००० नागरिक येत्या लोकसभा निवडणुकीत नोटाचा पर्याय स्वीकारणार आहेत. डंपिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावर या भागातल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतला हजारो टन कचरा या भागात टाकला जातो त्यामुळे नागरिक अक्षरशः गुदमरलेत.