डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं चिमुकलीनं गमावला जीव

Last Updated: Monday, June 23, 2014, 19:50

सोलापूर शासकीय रूग्णालयातल्या डॉक्टरांचा मनमानीपणा चव्हाट्यावर आलाय. कुत्र्यानं चावा घेतलेल्या एका मुलीला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळं त्या मुलीचा मृत्यू झालाय. मृत्यूनंतर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राखून ठेवल्यामुळं डॉक्टर आणि मृताच्या नातेवाईकात वाद झाला. उपचार न मिळाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.