Last Updated: Friday, December 27, 2013, 13:35
पुण्यातील दारुभट्टी अजित पवार, आर आर पाटील यांनी बंद करायची का?, असे खडेबोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पोलिसांना सुनावले. अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजता पुण्यातील फुरसुंगी कचरा डेपोला भेट दिली. त्यावेळी कचराडेपोजवळ दारूभट्टी सुरू असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर पवारांचा पाराच चढला. त्यावेळी त्यांनी पोलिसांनी चांगलेच झापले.