Last Updated: Sunday, December 25, 2011, 23:52
उत्तर प्रदेशाच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ प्रतिमेची छबी मतदारांवर ठसवण्यासाठी मुख्यमंत्री मायावतींनी चार मंत्र्यांची हकालपट्टी केली आहे. या हकालपट्टीसाठी कोणतेही कारण देण्यात आलेलं नाही. पण सूत्रांनी हे चौघे पक्ष विरोधी कारवाया आणि भ्रष्टाचारात आघाडीवर होते असं सांगितलं.