... जेव्हा निवृत्त पोलीस निरीक्षकच अंधश्रद्धेच्या आहारी जातात

Last Updated: Monday, January 20, 2014, 09:21

उस्मानाबादमध्ये काळ्या जादूसाठी खोदकाम करण्याप्रकरणी बार्शीचे निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर आणि त्यांच्या मुलासह ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झालाय.