मोदी पंतप्रधान झाले तर आनंदच – अडवाणी

Last Updated: Thursday, October 17, 2013, 07:59

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अखेर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची स्तुती करत मोदी पंतप्रधान झाल्यास आपल्याला आनंदच होईल असं म्हटलंय. मोदींची स्तुती करुन अडवाणींनी आपली नाराजी दूर झाल्याचंच दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय.