आजऱ्यात हतींचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान

Last Updated: Saturday, December 21, 2013, 19:30

कोल्हापूर जिल्हयातील आजरा तालुक्यात हत्तींचा कळप घुसलाय. पाच हत्तींच्या कळपानं अजरा शहराजवळील शेतीकडे आपला मोर्चा वळला आहे. या हत्तींनी ऊस, केळी आणि भातासारखी पिकं फस्त करायला सुरूवात केलीय. त्यामुळं या तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय.