तहानलेले प्राणी, पुणेकर पाजतायत पाणी

Last Updated: Monday, April 23, 2012, 20:57

अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हाचा त्रास माणसांबरोबर प्राणी आणि पक्ष्यांनाही होतोय. कात्रजच्या जंगलात पाण्याचे स्त्रोत आटल्यानं प्राण्यांचीही परवड होतेय. या प्राण्यांना पाणी मिळावं, यासाठी पुणेकरांनीच पुढाकार घेतलाय.