फुटबॉल वर्ल्ड कप : आज स्पेन - नेदरलँड्समध्ये रंगत

Last Updated: Friday, June 13, 2014, 08:10

फुटबॉल वर्ल्ड कपमधील मोस्ट अवेटेड अशी मॅच डिफेंडिंग चॅम्पियन्स स्पेन आणि उपविजेते नेदरलँड्समध्ये होणार आहे. 2010 मध्ये स्पेननं नेदरलँड्सला पराभूत करत वर्ल्ड कप विजयावर नाव कोरलं होतं. त्यामुळे या मॅचमध्ये ही ऑरेंज आर्मी गेल्या वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा काढण्यास आतूर असेल.

ब्राझीलमध्ये फुटबॉल वर्ल्ड कपचा दिमाखदार सोहळा

Last Updated: Friday, June 13, 2014, 07:55

फुटबॉलच्या पंढरीत अर्थातच ब्राझीलमध्ये फुटबॉल वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीचा दिमाखदार सोहळा रंगला. या सोहळ्यात ब्राझीलच्या संस्कृतीची झलक पाहायाला मिळाली. अतिशय छोटेखानी झालेल्या या ओपनिंग सेरेमनीमध्ये ब्राझीलचे वेग-वेगळे रंग पाहायला मिळाले.

ब्राझीलमध्ये आजपासून रंगणार फुटबॉलपटूंचा महामेळा

Last Updated: Thursday, June 12, 2014, 08:37

ब्राझीलमध्ये फुटबॉलपटूंचा महामेळा रंगणार आहे. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 32 टीम्समध्ये लढत होत आहे. मोस्ट अवेटड असा फुटबॉल वर्ल्ड कप 12 जूनला कीक-स्टार्ट होणार आहे. जगभरातील 32 टीम्समध्ये फुटबॉल वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्यासाठी रेस लागणार आहे. फुटबॉलपटूंचा हा महामेळा फुटबॉलप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये कोणत्या ग्रुपमध्ये कोणत्या टीम्सचा समावेश असणार आहे. त्यावर एक नजर.