बिग बॉसमध्ये यायचंय शाहरुखला!

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 13:49

दबंग खान आणि शाहरुख खानमध्ये तणावाच्या चर्चा नेहमीच रंगतात, असं असलं तरी शाहरुख सलमानच्या बिग बॉसचा चांगलाच फॅन आहे. दुबईत पत्रकारांसोबत बोलतांना शाहरुखनं सलमानचा शो बिग बॉसची स्तुती तर केलीच शिवाय संधी मिळाल्यास त्यात सहभागी होण्याची इच्छाही दर्शविली.