मोदींच्या विजयासाठी पत्नी जशोदाबेन यांचं मतदान

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 14:18

ज्यांची अनेक दिवसांपासून सर्व माध्यमं आणि नागरीक वाट पाहत होते, त्या जशोदाबेन मोदी आज समोर आल्या. आज गुजरातमध्ये सर्व २६ जागांसाठी मतदान होतंय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला. मेहसाणा मतदारसंघात त्यांनी मतदान केलं.