मुंबई विद्यापीठात आता मार्कांचा नवा घोळ

Last Updated: Thursday, December 5, 2013, 19:12

नवनव्या वादांना जन्म देणा-या मुंबई विद्यापीठात आता मार्कांचा नवा घोळ घातला गेलाय. ६० मार्कांची लेखी आणि ४० मार्कांच्या इंटरनल परीक्षेत मिळालेल्या गुणांमध्ये तफावत आढळल्यास इंटरनलचे मार्क कमी करण्याची नवी पद्धत विद्यापीठानं सुरू केलीये. याचा शेकडो विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.