छत्तीसगडमध्येही भाजपची विजयाची हॅट्ट्रीक!

Last Updated: Monday, December 9, 2013, 08:26

अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून धरलेल्या छत्तीसगडमध्ये अखेर भाजपचीच सत्ता आलीय. मुख्यमंत्री रमण सिंह यांनी सत्तेची हॅटट्रीक केलीय. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून भाजपच्या पाठिशी खंबीरपणे उभा असलेल्या बस्तरनं यावेळी मात्र भाजपची साथ सोडली. छत्तीसगडमध्ये अपेक्षेप्रमाणं भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला हा चुरशीचा सामना भाजपनं जिंकला.

"मुलाने केलं पाप, तरी गुन्हेगार ठरणार बाप!"

Last Updated: Monday, July 16, 2012, 16:05

छत्तीसगढचे मुख्यमंत्री डॉक्टर रमण सिंग यांनी एक विचित्र वक्तव्य केलं आहे. रमण सिंग यांचं म्हणणं आहे की मुलाच्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या वडिलांना देण्यात यावी. रणण सिंग यांच्या मते मुलाच्या गुन्ह्याचे खरे अपराधी वडील असतात.