राहुल द्रविडचं क्रिकेटला 'गुडबाय'

Last Updated: Friday, March 9, 2012, 15:30

राहुल द्रविडने आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. नव्या दमाच्या युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी निवृत्ती घेतल्याचे राहुल द्रविडने म्हटले आहे. बंगळुरू येथील पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.

अभेद्य राहुल द्रविडची कारकीर्द

Last Updated: Friday, March 9, 2012, 10:42

राहुलने आत्तापर्यंत १६४ टेस्टमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. १३ हजार २८८ रन्स त्याच्या बॅट्समनधून आले आहेत. द्रविडने ३६ आंतरराष्ट्रीय टेस्ट सेंच्युरी झळकावल्या आहेत. त्याने ५२.३१ च्या सरासरीने रन्स काढल्या आहेत.