सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न महागणार! गृहकर्जाचा हप्ता वाढणार!

Last Updated: Monday, September 23, 2013, 20:40

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी रेपो दरात पाव टक्क्याने वाढ केली आहे. त्याचा थेट परिणाम बँकांच्या कर्जदारांना बसणार असून त्यांच्या गृहकर्जाचा हप्ता (ईएमआय) किमान तीन टक्के म्हणजेच ५०० रुपयांनी वाढणार आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.