Last Updated: Thursday, March 27, 2014, 21:11
नावात काय आहे असं नेहमी म्हटलं जातं, पण निवडणुकीच्या रिंगणात नावाला बरंच महत्त्व असतं. एक सारखं नाव आणि आडनावाची उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरली तर बलाढ्य उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो. मावळ लोकसभा मतदार संघात एकाच नावानं असेच उमेदवार उभे राहिलेत. आता ते कोणी उभे केले? का केले? हे गुलदस्त्यात असलं तरी त्याचा फटका तुल्यबळ उमेदवाराला बसण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.