भारताने जगाचा भरोसा गमावलाय - रतन टाटा

Last Updated: Thursday, August 29, 2013, 08:58

जागतिक बाजारात भारताची पत पुन्हा सुधारावयाची असेल तर कोणाच्याही दबावाखाली न येता सरकारने आर्थिक धोरणे आहे तशीच राबविली पाहिजेत, असे मत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केले आहे. रूपयाचा होणारे अवमूल्यन आणि घसरलेली पत यावर त्यांनी भारताच्या धोरणावर टीका केली.