Last Updated: Saturday, October 26, 2013, 12:39
एखादी ट्रेन उशिरा असेल किंवा रद्द झाली असेल तर? असा प्रश्न अनेकवेळा तुमच्या समोर येतो. त्यावेळी तुम्ही चिंतीत होता. मात्र, ही चिंता मिटली आहे. कारण रेल्वेने तुमच्यासाठी रेल्वेचे अपडेट्स देण्याचा फंडा शोधून काढलाय. प्रवाशांच्या माहितीसाठी रेल्वे गाड्यांचे अपडेट्स थेट मोबाईलवर पाहायला मिळू शकतात. त्यासाठी मध्य रेल्वेने मेनलाईन सेवांचे अपडेट्स आपल्या संकेतस्थळावरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.