मोदी सरकारचं संसदेचं पहिलं अधिवेशन 4 जूनपासून

Last Updated: Thursday, May 29, 2014, 14:27

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचं संसदेतील पहिलं विशेष अधिवेशन हे येत्या ४ जूनपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन ११ जूनपर्यंत चालेल. ४ आणि ५ जूनला खासदरांचा शपथविधी होईल. तर जूनला लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाईल अशी माहिती, संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली.