सचिनचा ‘मास्टर’ स्ट्रोक ‘फ्लॉप’, निवृत्तीची चर्चा?

Last Updated: Monday, December 17, 2012, 15:04

जगातील भल्या भल्या बॉलरला इंगा दाखवणारा ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरला सध्या अपयशाचा सामना करावा लागत आहे. सातत्याने येणारे अपयश यामुळे मास्टरवर टीका होत आहे. त्याला निवृत्तीचा सल्ला देण्यात येत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील ७६ धावांची एक मात्र खेळी वगळता सचिनची बॅट म्यान झाली आहे. सचिनच्या निवृत्तीची चर्चा ‘जोरात’ असून पत्नी नागपुरात दाखल झाल्यामुळे या चर्चेला उधाण आलंय.