ठाण्यात सेनेने पाडले राष्ट्रवादीला खिंडार!

Last Updated: Monday, January 9, 2012, 19:48

ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुभाष भोईर यांनी पक्षाला रामराम ठोकण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचं त्यांनी झी चोवीस तासशी बोलताना सांगितले आहे.