Last Updated: Tuesday, March 27, 2012, 18:11
पुण्यात वादग्रस्त बीआरटीविरोधात शिवसैनिकांनी आज आंदोलन केले. शिवसैनिकांनी हडपसरमध्ये बुलडोझर चालवत तब्बल ४०० ते ५०० मीटरचा बीआरटी रूट उध्वस्त केला. या आंदोलनामुळे नवा वाद निर्णाण होण्याची शक्यता आहे. अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांना काहीही करता आले नाही. त्यामुळे रस्ता उखडण्यापर्यंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी मजल गेली.