सैफ अली खानचे काका होणार ISI प्रमुख?

Last Updated: Monday, February 27, 2012, 21:48

टीम इंडियाचे माजी कर्णधार दिवंगत मन्सूर अली खान पतोडी यांचे चुलत बंधू आणि सध्या पाक गुप्तहेर संघटना आयएसआयचे उपमहासंचालक इस्फंदियार अली खान यांच्या गळ्यात आयएसआयच्या प्रमुखपदाची माळ पडणार असल्याचे वृत्त आहे. बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खानचे ते चुलते आहेत. इस्फंदियार खान हे सध्या आयएसआयमध्ये दुस-या क्रमांकाच्या पदावर विराजमान आहेत.