खासदार राजू शेट्टी यांनी `त्या` मुद्याला दिली तिलांजली

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 20:59

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. पण खासदार राजू शेट्टी यांनी ज्या मुद्यावर शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याशी फारकत घेतली, त्याच मुद्याला आता शेट्टींनी तिलांजली दिल्याचं स्पष्ट होतंय.

राजू शेट्टी जातीयवादीच, आव्हाडांची टीका

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 19:21

राजू शेट्टींच्या महायुतीतल्या समावेशावर राष्ट्रवादी काँग्रेसनं टीका केलीय. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा खरा चेहरा उघड झालाय. जातीयवादी पक्षांबरोबर जावून आपण जातीयवादी असल्याचं त्यांनी दाखवून दिल्याची टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.