केजरीवालांच्या आरोपांना काँग्रेसचं उत्तर

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 23:18

केजरीवालांच्या आरोपांना काँग्रेसनं उत्तर दिलंय. घोटाळा झाला असेल तर त्याचे पुरावे द्या असं आव्हान काँग्रेसनं दिलंय. तसंच मिडीयाद्वारे केवळ प्रसिद्धिसाठी आरोप केले जात असल्याचा पलटवारही काँग्रेस प्रवक्ते राशिद अल्वी यांनी केलाय. तर हरियाणा सरकारनेही केजरीवालांचे आरोप फेटाळले आहेत.

डीएलएफ आणि हरियाणा सरकारचं साटंलोटं- केजरीवाल

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 19:11

`इंडिया अगेन्स्ट करप्शन`चे अरविंद केजरीवाल यांनी रॉबर्ट वडेरा, डीएलएफ आणि हरियाणा सरकारच्या संबंधांबाबत आणखी एक नवा गौप्यस्फोट केलाय. डीएलएफच्या सेझमध्ये रॉबर्ट वडेरा यांचे 50 टक्के शेअर्स असल्याचा दावा केजरीवालांनी केलाय.