मैत्रीला काळिमाः दीडशे रुपयांसाठी मित्राचा केला खून

Last Updated: Friday, May 9, 2014, 08:36

अवघे दीडशे रुपये परत केले नाही म्हणून एका मित्राने आपल्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपूर मध्ये उघड झाली. नागपूरच्या तहसील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भावसार मंगल कार्यालयाजवळ कचरा वेचणाऱ्या निलेश धुंडेच्या नावाच्या व्यक्तीची हत्या झाली होती. पोलिस तपासादरम्यान १५० रुपयाच्या उधारीवरूनच आपण निलेशची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या प्रकरणात २ आरोपींना अटक केली आहे.