गुजरात दंगली प्रकरणी मोदींना माफी मागायची गरज नाही- सलमान

Last Updated: Monday, January 20, 2014, 11:22

बॉलिवूडचा दबंग खान सलमाननं पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची स्तुती केलीय. सलमाननं एका न्यूज वाहिनीसोबत बोलतांना गुजरात इथं २००२मध्ये झालेल्या दंगली प्रकरणी नरेंद्र मोदींनी माफी मागण्याची काही गरज नाही, असंही म्हटलंय. सलमान म्हणतो जेव्हा कार्टानं याबाबतीत त्यांना क्लीनचिट दिलीय. तर मोदींना मागण्याची गरज नाही.